वटपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ट्वीटविषयी हिंदु समाजाची क्षमा मागावी ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोल्हापूर, २५ जून (वार्ता.) – वटपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी ट्वीट केले असून त्यात ‘वटपौर्णिमेच्या भरवश्यावर राहू नका, बाईक चालवतांना हेल्मेट नेहमी वापरा’, असे आवाहन केले आहे. पोलिसांना हिंदु माता-भगिनींच्या श्रद्धेला हात घालण्याचा अधिकार कुणी दिला ? २५ डिसेंबरला नाताळला वाहने व्यवस्थित चालवा, अन्यथा तुम्हाला क्रुसाचा आधार घेऊन उभे रहावे लागेल किंवा ईदला (गोहत्या प्रतिबंधक कायदा) अस्तित्वात असतांनाही कायदा मोडण्याची हिंमत करणार्यांना कायद्याचा जमालगोटा देऊ; अशी ‘टिवटिव’ करण्याची हिंमत ते दाखवतील का ? ‘सेक्युलर सेन्स ऑफ ह्युमर’ केवळ हिंदूंनाच आहे का ? वटपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ट्वीटविषयी हिंदु समाजाची क्षमा मागावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे.