चीनकडून अरुणाचल प्रदेशजवळील भागात बुलेट ट्रेनची सेवा चालू !
चीन सीमेजवळ पोचण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत आहे. भारतानेही चीनला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
बीजिंग (चीन) – चीनने तिबेटमध्ये बुलेट ट्रेनची सेवा चालू केली आहे. भारतीय सीमेजवळ असलेल्या हिमालयाच्या क्षेत्रात ही बुलेट ट्रेनची सेवा चालू केली आहे. या बुलेट ट्रेनद्वारे तिबेटची राजधानी ल्हासा आणि नियंगची हे भाग जोडले जाणार आहेत. नियंगची हा भाग अरुणाचल प्रदेशच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे. या सेवेमुळे ४८ घंट्यांचा प्रवास अवघ्या १३ घंट्यांत करता येणार आहे.
China launches first bullet train in Tibet, close to Indian border https://t.co/wxCQ95kTrD pic.twitter.com/96p7fuL3Ut
— The Times Of India (@timesofindia) June 25, 2021