लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला, तरी रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अल्प ! – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
नवी देहली – देशात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ७६ टक्के नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याची प्रकरणे आढळली आहेत; मात्र अशांना रुग्णालयात भरती करण्याची शक्यता पुष्कळ अल्प आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात भरती झालेल्या २७ पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (‘आय.सी.एम्.आर्.’ने) तिच्या अहवालात दिली आहे. या अहवालानुसार संसर्ग झालेल्या या रग्णांमध्ये १७ टक्के जणांना कोणतीही लक्षणे नव्हती, तर १० टक्के जणांना रुग्णालयात भरती करावे लागले.