धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !

भारतातील १ सहस्राहून अधिक हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकरण

  • भारतात धर्मांतरविरोधी कायदे नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत आले आहे आणि होत आहे. जर धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील. ज्याप्रमाणे भारताचे विभाजन होऊन पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्तान अन् पुढे बांगलादेश यांची निर्मिती झाली, त्याप्रकारे भारताचे पुढे अनेक तुकडे होऊन ख्रिस्ती आणि इस्लामी देश होण्याचा धोका संभवतो.
  • हिंदूंनो, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणत. केवळ पुढील १०-२० वर्षांचा संकुचित विचार न करता, पुढील ५०-१००-२००-५०० वर्षे या व्यापकतेने विचार करा आणि भारताचे आणखी तुकडे होऊ द्यायचे नसल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

नवी देहली – भारतीय राज्यघटनेने धर्मप्रसार करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मीय त्याच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी स्वतंत्र आहे. यातूनच मग कुटील डाव आखून धर्मांतराचा प्रयत्न केला जातो. देशात धर्मांतराविषयी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. त्यामुळे ख्रिस्ती मिशनरी, तसेच इस्लामी संघटना यांचे फावते आहे. नुकतेच उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्राहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा मौलानांना अटक केली आहे. त्यांना आता भारतीय कायद्यानुसार शिक्षा होईल. दुसरीकडे जगातील अनेक देशांत धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना तेथे घडत नाहीत.

धर्मांतराला आळा घालण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी असलेले देश पुढीलप्रमाणे –

१. नेपाळ : येथे कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करू शकते; मात्र अन्य कुणाचेही धर्मांतर घडवून आणू शकत नाही. जर कुणी असे केले, तर कायद्यानुसार त्यास ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.

२. म्यानमार : वर्ष २०१५ मध्ये म्यानमारने धर्मांतराविषयी ४ कायदे केले आहेत. यानुसार जर एखादी व्यक्ती धर्मपरिवर्तन करू इच्छित असेल, तर त्यासाठी सरकारकडून अनुमती घेणे आवश्यक आहे. त्यातही जर बौद्ध धर्मीय तरुणी अन्य धर्मातील तरुणाशी विवाह करू इच्छित असेल, तर सरकार याची चौकशी करते. तसेच यासाठी विविध स्तरांवर अनुमती घ्यावी लागते.

३. भुतान : येथे आमीष दाखवून अथवा बलपूर्वक धर्मांतर करणार्‍यांच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आहे आणि त्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे.

४. श्रीलंका : येथे वर्ष २००४ मध्ये धर्मांतरविरोधात रष्ट्रीय कायदा बनवण्यात आला; मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली आहे. वर्ष २००४ मध्ये श्रीलंकेत सुनामी आल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी गरीब आणि असाहाय्य सुनामी पीडितांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत त्यांना नोकरी, पैसे आणि घर देण्याचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. (ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हेच खरे स्वरूप आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हेच खरे स्वरूप आहे, हे लक्षात घ्या !

५. ग्रीस : येथे धर्मांतरावर बंदी आहे. येथे ग्रीस ऑर्थोडॉक्स चर्चच्या व्यतिरिक्त कुणीही कोणत्याही धर्माचा प्रसार करू शकत नाही.

६. सोमालिया, सुदान आणि सौदी अरेबिया : या इस्लामी देशांमध्ये इस्लाम व्यतिरिक्त अन्य धर्मांचा स्वीकार करणे कायदाविरोधी आहे.

९. मालदीव : हे मुसलमानबहुल बेट असलेले राष्ट्र आहे. येथे कोणत्याही मुसलमान नागरिकाने धर्मांतर केले, तर त्याचे नागरिकत्व काढून घेतले जाते.

 

१०. मलेशिया : येथे धर्मपरिवर्तन करण्याची अनुमती शरियत न्यायालयाकडून घ्यावी लागते. काही मासांपूर्वी येथे एका मुसलमान मुलीचे भारतीय खिस्ती तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिने मुसलमान धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर  धर्मांतर हे कायदाविरोधी असल्याचे सांगत ते रहित करण्यात आले होते.

११. अफगाणिस्तान : येथेही मुसलमान धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यावर बंदी आहे. वर्ष २००६ मध्ये न्यायालयाने मुसलमान धर्म सोडून खिस्ती धर्म स्वीकारणार्‍याला फाशीची शिक्षा ठोठावली होती.

१२. जॉर्डन, इजिप्त आणि कुवैत : या इस्लामी देशांमध्येही इस्लाम सोडून अन्य धर्मांचा स्वीकार केल्यास कारावासाची शिक्षा आहे.