खारघर येथील बोगस आधुनिक वैद्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी !
नवी मुंबई – खारघर भागातील सेक्टर १५ येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील रोहित गुप्तेश्वर यादव (वय २७ वर्षे) या बनावट आधुनिक वैद्याला पनवेल महानगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. तो रुग्णांची तपासणी करून उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. तो निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून या रुग्णालयात कार्यरत होता. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.