सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील साधकांसाठी ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ पार पडले !
मिरज (जिल्हा सांगली) – सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील साधकांसाठी ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ नुकतेच घेण्यात आले. या शिबिरात मूलभूत जीवित रक्षण साहाय्य, हृदय-श्वसन पुनरुज्जीवन तंत्राचा वापर, सुरक्षित आरामदायी स्थिती, पाठीच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार करतांना कशी काळजी घ्यावी, त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने झोळी बांधणे, रस्त्यावरच्या अपघातामध्ये रुग्णाचे शिरस्त्राण काढणे, रुग्णाला इतरत्र वाहून नेण्याच्या विविध पद्धती, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा लाभ अनेक साधकांनी घेतला. शिबिराच्या आयोजनात मिरज येथील डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले यांचा प्रमुख सहभाग होता.