नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचा विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय !

विद्यार्थ्यांकडून शुल्काची आकारणी न करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर – कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतून जात आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे राज्यातील हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी जीवन विमा आणि अपघात विमाही काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न आकारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयासाठी कुलगुरूंचे पत्रकार परिषदेतून आभार मानण्यात आले.