‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !
‘एस्.एस्.आर्.एफ्.’लाइव्ह चॅट वरील अभिप्राय
१. कलियुगात लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ ते कार्य उत्तम प्रकारे करत आहे ! : ‘तुम्ही सांगितलेल्या नवीन स्वयंसूचनेचे सत्र मी मनापासून करणार आहे. तुम्ही पूर्वी सांगितलेल्या स्वयंसूचनेचाही मला लाभ होत आहे. माझा मानसिक त्रास वाढल्याने मी आता नामजपाचा कालावधी वाढवला आहे. कलियुगात लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे आणि हे कार्य ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ उत्तम प्रकारे करत आहे.’
– श्री. किर्थना चेगू, सॅन जोस, अमेरिका.
२. मीठ-पाण्याचे उपाय, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप यांमुळे पालट जाणवणे : ‘संकेतस्थळावर सांगितल्यानुसार मी नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ-पाण्याचे उपाय करू लागलो, तसेच घरात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजपही लावून ठेवत आहे. त्यामुळे घरात पुष्कळ चांगले पालट जाणवत आहेत.’
– श्री. सतिजा, अमेरिका
३. अनाहत आणि आज्ञा चक्र यांवर न्यास करून नामजप करतांना प्रारंभी श्वास घ्यायला त्रास होऊन ग्लानी येणे, काही दिवसांनंतर छातीतील वेदना न्यून होणे : ‘मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘कुंडलिनी चक्र’ या ‘लाइव्ह स्ट्रीम’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. या वेळी पू. (सौ.) भावना शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. गेले काही दिवस माझ्या छातीत दुखत होते. पू. (सौ.) भावनाताईंनी सप्तचक्रांतील अडथळे दूर करण्यासाठी मला मंत्रजप सांगितला. त्यानुसार मी अनाहत आणि आज्ञा या चक्रांवर न्यास करून तो जप केला. त्या वेळी मला श्वास घ्यायला त्रास होणे आणि ग्लानी येणे, असे त्रास झाले; मात्र नंतर माझे छातीतील दुखणे न्यून झाले.’
– श्री. बाबू, कर्नाटक, भारत.
४. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाचे वर्णन : मी या संकेतस्थळाचे वर्णन ‘अध्यात्माविषयी जिज्ञासापूर्ती करणारे, तसेच आध्यात्मिक समस्या आणि त्यांवरील सहजसोपे उपाय यांविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव स्थान’, असे करीन.’
– श्री. राकेश चांदगोथिया, नवी देहली, भारत.
५. नामजप करतांना चमेलीचा सुगंध येऊन सकारात्मक वाटणे आणि साधनेला आरंभ केल्यानंतर कुटुंबात पालट होणे : ‘आज मी लहान बाळाला झोपवतांना बसून नामजप केला. त्या वेळी मला चमेलीच्या सुगंधाची अनुभूती आली आणि पुष्कळ चांगले वाटले. आम्ही नुकताच साधनेला आरंभ केला आहे. केवळ एका दिवसातच माझ्या पूर्ण कुटुंबात पालट झाल्याचे मला जाणवत आहे. माझी मुले आता शांत झाली आहेत. रात्रीच्या वेळी माझे बाळ पुष्कळ रडत असे; पण आता ते शांत झाले आहे.’
– सौ. सूर्या, बेंगळुरू, भारत.
६. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ अध्यात्मप्रसाराचे दुर्मिळ कार्य करत आहे ! : ‘आज मला केवळ ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे अभिनंदन करायचे आहे. सध्याच्या काळात अध्यात्माचा खरा प्रसार करणारे पुष्कळ दुर्मिळ झाले आहेत; मात्र तुम्ही ते करत आहात आणि त्यामुळेच हे कार्य अनमोल आहे. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे.’
– श्री. नचिकेत, हैद्राबाद, भारत.
७. सध्या चालू असलेल्या जागतिक घडामोडी आणि इतिहासातील प्रसंग पहाता ‘तिसरे महायुद्ध’ या संदर्भातील लेख सत्य आहेत’, यावर विश्वास बसणे : ‘मी संकेतस्थळावरील ‘तिसरे महायुद्ध’ या संदर्भातील लेख वाचले. लेख वाचल्यावर प्रथम ‘ते चुकीचे आहेत’, असे मला वाटले; मात्र सध्या चालू असलेल्या जागतिक घडामोडी आणि इतिहासातील प्रसंग यांचा विचार केला असता ‘लेखात दिलेली सूत्रे सत्य आहेत’, असे मला वाटले. मी या लेखाविषयी माझे मित्र अथवा समाजातील लोक यांना सांगितले, तर त्यांचा विश्वास बसणार नाही; मात्र ‘लेखात दिल्यानुसार प्रसंग घडत आहेत’, यावर माझा विश्वास बसला आहे.’
– श्री. सॅम, भारत
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |