पू. (सौ.) भावनाताई म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी रूप ।
पू. भावनाताई म्हणजे परम पूज्यांचे (टीप) समष्टी रूप ।
समष्टी साधना करतांना त्या होतात देवाशी एकरूप ।। १ ।।
आईच्या वात्सल्याप्रमाणे करतात प्रेमाचा वर्षाव ।
निरपेक्ष प्रीती हाच पू. ताईंचा साधकांप्रती भाव ।। २ ।।
साधकांची व्यष्टी अन् समष्टी साधना हाच त्यांचा ध्यास ।
साधकांचा उद्धार हाच असे त्यांचा निजध्यास ।। ३ ।।
पू. ताईंच्या रूपात परम पूज्यांनी दिली आम्हा एक अमूल्य भेट ।
त्यांच्यातील श्रद्धेमुळे साधक जातीलच मोक्षाकडे थेट ।। ४ ।।
टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
– सौ. योगिता चेऊलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |