‘दलितांना सन्मान द्यायला अल्प ठरल्याने ते धर्मांतर करून ख्रिस्ती होतात !’ – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – जर दलित समाजातील लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारत असतील, तर त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवले पाहिजे. आपण त्यांचे संरक्षण करण्यात अल्प पडतो. जेव्हा हे लोक धर्मांतर करतात, तेव्हा त्यांना तो मान दिला जातो, जो दलित असल्याने आपण देत नाही. (धर्मांतर करतांना देण्यात येणार मान हा केवळ नाटकी असतो, नंतर त्यांना तुच्छच लेखले जाते, हे राव का सांगत नाहीत ? तसेच दलितांसाठी वेगळे चर्च असते. उच्चवर्णीय ख्रिस्ती त्यांच्यामध्ये मिसळत नाहीत, यावर राव सोयीस्कररित्या मौन बाळगत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) मी स्वत: हिंदू आहे; मात्र दलितांना आजही गरिबीला तोंड देत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, हे पाहून मला फार दु:ख होते, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कामारेड्डी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.
While Telangana CM claims Dalits who convert to Christianity get ‘respect they were denied’, the ground reality is different. Here is howhttps://t.co/1qidf03Iao
— OpIndia.com (@OpIndia_com) June 24, 2021
राव पुढे म्हणाले की, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन गरीब आणि दलित यांना साहाय्य करून त्यांना या गरिबीतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.