मुर्टा (जिल्हा धाराशिव) येथे ‘घनदाट वृक्ष लागवड’ मोहिमेअंतर्गत ५० सहस्र वृक्ष लागवडीस प्रारंभ !
मुर्टा (जिल्हा धाराशिव) – तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे ‘घनदाट वृक्षलागवड’ मोहिमेअंतर्गत २२ जून या दिवशी ५० सहस्र वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. येथे ४ ते ५ दिवसांत ५० सहस्र झाडांची लागवड करण्यात येणार आहे. धाराशिव येथील जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अन्य मान्यवरही उपस्थित होते.