कोरोना काळात सेवाकार्य करणार्या व्यक्ती, समूह यांच्या सेवा कार्याला होर्डिंगद्वारे अभिवादन !
कोल्हापूर, २३ जून – कोरोना काळात सेवाकार्य करणार्या व्यक्ती, समूह यांची विशेष नोंद पुणे भाजपच्या वतीने घेण्यात आली.
जूनच्या प्रारंभी पुण्यातील प्रमुख चौक ‘अभिमान पुण्याचा’ या मोहिमेने झळकले. याच शृंखलेतील पुढचा भाग म्हणून कोल्हापूर शहरातही अशाच प्रकारे मोहीम राबवली जात आहे.
कोरोना काळातील निरपेक्ष सेवावृत्तीला तितक्याच निरपेक्ष भावनेने उजाळा देणे, ही एकमेव भावना बाळगून कोल्हापूर भाजपने अशीच होर्डिंग प्रदर्शित करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. यातून भाजपच्या वतीने विविध संस्था, व्यक्ती यांच्या सेवावृत्तीला केलेले हे अभिवादन आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वतीनेही अशाच प्रकारचे होर्डिंगही लावण्यात आले आहेत.