शिशूवर्गातील (नर्सरीतील) प्रवेशासाठी मुलाचे वय ३ वर्षे पूर्ण होणे आवश्यक
राज्यशासनाकडून पूर्वप्राथमिक स्तरावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ लागू
पणजी, २२ जून (वार्ता.) – राज्यशासनाने पूर्वप्राथमिक स्तरावर २२ जूनपासून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ लागू केले आहे. राज्यशासनाने परिपत्रक प्रसिद्ध करून शिशूवर्ग (नर्सरी) चालवणार्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ‘नर्सरी’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याच्या वयाची ३ वर्षे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पूर्वप्राथमिक स्तरावर प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्याचे वय ३१ मेपर्यंत ३ वर्षे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.