व्हॅटिकनने चर्चमध्ये मुलांचे लैंगिक शोषण करणार्यांना पाठीशी घातले !
संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित तज्ञांकडून व्हॅटिकनला पत्र !
|
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – व्हॅटिकन चर्चने चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. त्यांनी असे करणार्यांना पाठीशी घातले. आता त्यांनी अशांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांसमवेत काम करणार्या स्वतंत्र मानवाधिकार तज्ञांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने याविषयी माहिती दिली.
A group of UN human rights experts said they had urged the Vatican to take steps to stop child sex abuse in Catholic institutions and prevent it from happening again.https://t.co/oFRpcgRLfE
— GMA News (@gmanews) June 22, 2021
१. चार तज्ञांनी एप्रिल मासामध्ये व्हॅटिकनला पत्र लिहिले होते. हे पत्र आता सार्वजनिक करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, चर्चने मुलांचे लैंगिक शोषण करणार्यांना वाचवण्याचा, त्यांचे गुन्हे लपवण्याचा आणि मुलांना हानीभरपाई टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
२. या पत्रातून तज्ञांनी आरोप केले आहेत की, चर्चच्या काही सदस्यांनी मुलांचे लैंगिक शोषण करणार्यांवर खटला चालवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक दशकांपासून अनेक देशांतील सहस्रो पीडितांवर हा अत्याचार करण्यात आला.