लागो ध्यास श्री गुरुचरणांचा ।

आपत्काळाविषयी साधकाच्या मनात उठलेल्या विचारांच्या काहुरावर श्रीकृष्णाने दिलेले उत्तर आणि साधकाने केलेली प्रार्थना !

श्री. शशांक जोशी

आपत्काळाची जेव्हा
लागे चाहूल ।
मनात माझ्या माजे काहूर ।
संत ज्यासी वर्णिती अतीप्रतिकूल,
होईल मला तो
कसा अनुकूल ।। १ ।।

श्रीकृष्ण मग प्रकटूनी मनी ।
वदे मज स्मितहास्य करोनी ।
गुरूंप्रती श्रद्धा वाढवूनी मनी ।
अखंड रहा तू श्री गुरुस्मरणी ।
श्री गुरुकृपेचे असता अभेद्य कवच ।
तुला न काळजी, न कशाचे भय ।। २ ।।

कृतज्ञता व्यक्त करोनी श्रीकृष्णचरणी ।
प्रार्थितो आम्ही श्री गुरुचरणी ।
श्रद्धा अन् भक्ती वाढू दे लवकरी ।
अखंड कृपा असावी आम्हावरी ।
लागो ध्यास श्री गुरुचरणांचा ।
आशीर्वाद द्यावा आम्हा अज्ञ बालकांना ।। ३ ।।

श्री गुरूंनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या कोमल चरणी अर्पण करतो. कवितेतील प्रार्थनेप्रमाणे ‘त्यांची कृपा आम्हा सर्व बालकांवर सातत्याने असू दे. आमची श्रद्धा आणि भक्ती वाढू दे अन् त्यांच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर जाता येऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे.

– गुरुचरणसेवक,

श्री. शशांक जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१२.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक