सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची न्यायालयात माहिती !
मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून ठाणे येथील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींनी याची स्वीकृती दिल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात सांगितले. २१ जून या दिवशी ‘एन्.आय.ए.’च्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांची ‘एन्.आय.ए.’ कोठडीची मागणी न्यायालयाने या वेळी मान्य केली.