कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेणार्यांना कारागृहात टाकणार ! – फिलिपीन्सच्या राष्ट्रपतींची चेतावणी
मनिला (फिलिपीन्स) – लोकांसमोर आता २ पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवे आहे, याची निवड तुम्हीच करायची आहे, अशा शब्दांत फिलिपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी जनतेला चेतावणी दिली आहे. फिलिपीन्समध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार वेगाने पसरत आहे.