(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती
जम्मू-काश्मीरचा आणि पाकचा काय संबंध ? अशा प्रकारची मागणी करणार्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे. तसेच त्यांच्या पक्षावर देशद्रोही कारवाया केल्यावरून बंदी घातली पाहिजे !
श्रीनगर – केंद्र सरकार तालिबान्यांशी चर्चा करत आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसमवेत चर्चा केली पाहिजे, तसेच पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.
महबूबा ने दिया बातचीत में रोड़ा अटकाने वाला बयान, कहा- पाकिस्तान से करो बात#PMModi #MehboobaMufti #JammuAndKashmir #Pakistan
यहां पढ़ें पूरी खबर: https://t.co/9cvxcjp3D7 pic.twitter.com/VUKeXXYDM6
— India TV (@indiatvnews) June 22, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एका बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील गुपकार गटाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी वरील मागणी केली. जम्मू-काश्मीरविषयीची सरकारची योजना या बैठकीत मांडली जाणार आहे.