गुरुदेव, तुमची एक दृष्टी हीच प्रीती ।
सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची दृष्टी म्हणजे निरपेक्ष प्रीती आहे’, हे त्यांच्याच कृपेने लक्षात आल्यावर मला पुढील काव्य स्फुरले. ते गुरुचरणी अर्पण करतो.
सिंहस्थपर्वात पहायला मिळाला ।
साधकांचा ईश्वरप्राप्तीचा ध्यास ।
त्यातून शिकायला मिळाला ।
साधकांचा साधनेचा खडतर प्रवास ॥ १ ॥
बोट धरूनी गुरूंनी निर्माण केले साधकत्व ।
दायित्व देऊनी शिकवले व्यापकत्व ॥ २ ॥
अध्यात्मप्रसाराचे शिवधनुष्य पेलण्या ।
नसे माझ्यात क्षमता ।
करता प्रयत्न थोडे निर्माण झाली गुणवत्ता ॥ ३ ॥
साधकांनी जाणीव करून दिली ।
कर सेवा गुरुचरणी समर्पित ।
अनुसंधान अनुभवल्यावर ।
गुरूंनी करवून घेतले मन गुरुचरणी समर्पित ॥ ४ ॥
नकारात्मतेवर मात होऊनी ।
जागृत झाली प्रतिभा ।
चार वर्णांची सेवा करूनी ।
वाढत आहे ज्ञानगंगा ॥ ५ ॥
या कृतज्ञतेला कृतज्ञतेविना अन्य नसे उपमा ।
अपूर्ण मी दास तुमचा मानोनी घ्या सेवा ॥ ६ ॥
अहंभावामुळे वाटत असे, मी आहे महाज्ञानी ।
प्रक्रिया (टीप १) शिकवूनी करून दिली जाणीव ।
मी आहे अज्ञानी ॥ ७ ॥
या अज्ञानी जिवात निर्माण केलात ।
भावभक्तीचा ओलावा ।
भरकटलो असतो मायानगरीत ।
वैकुंठात दिला तुम्ही ।
व्यष्टी आणि समष्टी साधनेचा ठेवा ॥ ८ ॥
धर्मकार्याचे शिवधनुष्य पेलण्या ।
आपण दिलेत अनंत गुण ।
अज्ञानी मी दास तुमचा ।
कधी फेडणार गुरुऋण ॥ ९ ॥
तुमच्या चरणी शरण येऊनी ।
होई गुणांची वृद्धी ।
होती ग्रहण विचार ईश्वराचे ।
अंतरी रुजली सद्सद्विवेकबुद्धी ॥ १० ॥
संकटांसमोर उभे राहिलात ।
परात्पर गुरु डॉक्टर तुम्ही ।
कठोर प्रारब्ध असोनी ।
तुमच्या दृष्टीने झाले अल्प ॥ ११ ॥
होती कृपा तुमची संकटकाळी ।
म्हणून वाटली नाही कधी भीती ।
पहाता तुमच्या नयनात ।
तुमची एक दृष्टी हीच प्रीती ॥ १२ ॥
प्रामाणिकपणाची फुले गुरुदेव ।
समर्पित करतो तव चरणी ।
शिकण्याची वृत्ती मजला द्यावी ।
हीच प्रार्थना गुरुचरणी ॥ १३ ॥
टीप १ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
– श्री. शुभम् पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१९)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |