‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प दिन’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
पातशाही, मुगलशाही यांना धूळ चारून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु धर्म, हिंदु समाज आणि हिंदुस्थान यांच्या संरक्षणासाठी सार्वभौम हिंदवी स्वराज्याचे सिंहासन स्थापन केले. तोच आदर्श समोर ठेवून आजच्या संकटग्रस्त परिस्थितीवर मात करण्याची स्फूर्ती मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पाप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प दिन’ साजरा करण्याच्या उद्देशाने २३ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, २३ जून २०२१, सायंकाळी ७ वाजता