शिरूर (पुणे) येथे दहशतीचे वातावरण निर्माण करून खंडणी वसुल करणार्या भोंदू समाजसेवकांना अटक !
शिरूर (पुणे), २१ जून – गुन्हेगार असूनही समाजसेवक असल्याचे भासवणार्या अमोल चौगुले आणि पप्पू चौगुले यांनी काही दिवसांपूर्वी मांडवगण फराटा परिसरात सामाजिक माध्यमांवर अवैध मद्य विक्रीविरोधात रस्त्यावर मद्य ओतून देत असल्याची ‘व्हिडिओ क्लिप’ सिद्ध करून ती सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली. या दोघांवर प्रत्येकी ८ गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिरूर पोलिसांनी या दोघांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे, तर या आरोपींचे साथीदार अजय सूर्यगंध आणि हृतिक परदेशी या दोघांना रांजणगाव पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सर्व आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे सोबत बाळगून दमदाटी करणे, दहशत माजवणे या गुन्ह्यात पारंगत आहेत.
अमोल चौगुले हा स्वतः घरात अवैध दारू विक्री करत होता. तसेच गावात दहशतीच्या जोरावर अनेकांना त्रास देत असे.