मिरज तालुक्यातील महिलांना अन्नदा पोषण आहार साहित्याचे वाटप !
मिरज – रुग्ण सेवा प्रकल्पाच्या वतीने मिरज तालुक्यातील कांचनपूर, साबंरवाडी, मानमोडी येथील गरजू महिलांना अन्नदा पोषण आहार साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मुंबई येथील अन्नदा संस्था मुंबई यांच्या सहकार्याने देण्यात आले. याचे संयोजन आप्पा पाटील यांनी केले होते. या वेळी मिरज येथील रुग्णसेवा प्रकल्पाचे डॉ. भालचंद्र साठ्ये यांच्यासह मिलींद भिडे, श्रेयस गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, आरोग्य सेविका अरुणा शिंदे, जयश्री काटकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.