‘बलात्कारासाठी महिलांचे तोकडे कपडे उत्तरदायी !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

  • महिलांनी तोकडे कपडे घालणे हे अयोग्य असले, तरी बलात्कारासाठी संपूर्णपणे त्यालाच उत्तरदायी कधीही ठरवता येणार नाही, हे कोणतीही सुज्ञ व्यक्ती सांगील ! बलात्कारामागे वासनांधता हाच मोठा दोष आहे. त्यामुळे अशा वासनांधांवर कठोर कारवाईच झाली पाहिजे !
  • ‘बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार होत नाहीत’, असे इम्रान खान म्हणू धजावतील का ?
पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर एखाद्या महिलेने तोकडे कपडे घातले असतील, तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. महिला रोबोट असल्यास हे घडणार नाही, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एखा मुलाखतीमध्ये केल्यामुळे पाकमधून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सध्या पाकमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून इम्रान खान यांनी वरील विधान केले. इम्रान खान यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे विधान केले होते.

याविषयी पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार डॉ. अरसलन खालिद यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, इम्रान खान यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते आपण कोणत्या प्रकारच्या समाजात रहातो आणि समाजातील लैंगिक निराशा यांविषयी बोलले होते.