पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून ‘इथेनॉल’चा वापर करणार ! – केंद्र सरकार
नवी देहली – केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून इथेनॉल हे इंधन तेल लवकरच बाजारात आणणार आहे. या तेलाचे मूल्य ६० ते ६२ रुपये प्रति लिटर असणार आहे. यासाठी वाहनांमध्ये ‘फ्लेक्स फ्यूल’ असणारे इंजिन असणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार वाहन उद्योग निर्मिती आस्थापनांना अशा इंजिनची वाहने बनवण्यासाठी बंधनकारक करणार आहे. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयी माहिती दिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, केवळ पेट्रोल इंजिन नाही, तर फ्लेक्स-फ्यूल इंजिन सिद्ध करण्याचा आदेश मी दिला आहे. यामुळे ग्राहकांपुढे आता २ पर्याय असणार आहेत.
त्यामुळे एकतर १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येऊ शकेल किंवा १०० टक्के इथेनॉलचा वापर करणे शक्य होईल. ब्राझिल, कॅनडा आणि अमेरिका येथील वाहन निर्मिती करणारी आस्थापने फ्लेक्स फ्यूल इंजिन सिद्ध करतात. या देशांमध्ये ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय प्रदान केला जात आहे.