म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या मुंबईतील ३ मुलांचे डोळे काढले !
कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारे संसर्गजन्य आजार हे आपत्काळाचेच द्योतक आहेत. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आतातरी लक्षात घ्या !
मुंबई – कोरोनातून बरे झालेल्या; पण म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या येथील ३ मुलांचे डोळे काढण्यात आले आहेत. त्या तिघांचे वय ४, ६ आणि १४ वर्षे आहे. ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे नव्हती. १४ वर्षीय मुलीला मधुमेह असून तिची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर ६ आठवडे उपचार करूनही तिचा डोळा वाचवता आला नाही. या व्यतिरिक्त एका १६ वर्षीय मुलीलाही म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. तिच्या पोटात आधुनिक वैद्यांना फंगस (बुरशी) आढळला; मात्र उपचार केल्यावर ती सध्या बरी आहे.