निवृत्ती वेतनधारकांचे खटले निकाली काढावेत !
नागपूर येथील ज्येष्ठ नागरिकाचे सरन्यायाधिशांना पत्र
नागपूर – ‘ज्येष्ठ नागरिकांचे खटले लवकरात लवकर निकाली काढण्याचे संकेत आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तरीही देशातील ‘ई.पी.एस्.-६५’च्या निवृत्ती वेतनधारकांचे खटले देशातील विविध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांत गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत’, असे पत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांना शहरातील ज्येष्ठ नागरिक दादा झोडे यांनी पाठवले आहे. ‘सद्यःस्थितीत ७००-८०० रुपये निवृत्ती वेतन मिळत आहे. त्यामध्ये औषधपाण्याचा व्ययही भागत नाही. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असलेले हे वयोवृद्ध गरीब निवृत्ती वेतनधारक हालाखीचे जीवन जगत आहेत’, असे झोडे यांनी पत्रातून सरन्यायाधिशांचे लक्ष वेधले आहे.