कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांच्या विरोधात पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
पुणे, २० जून – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १९ जून या दिवशी झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक नीलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह १०० ते १५० महिला आणि पुरुष पदाधिकार्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीतच अशाप्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.