सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप !
शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्या ‘ॲरोबिक्स’सारख्या व्यायाम-प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम आणि थोडेफार मनोरंजन होते. प्राचीन ऋषिमुनींची देणगी असलेल्या योगासनांमुळे कित्येक वर्षे निरोगी आणि दीर्घायु रहाता येते. भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू हे क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून प्रतिदिन १ सहस्र २०० सूर्यनमस्कार घालत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी हे ब्राह्ममुहूर्तावर प्रतिदिन १ सहस्र २०० सूर्यनमस्कार घालत असत. आज असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’च्या निमित्ताने सूर्यनमस्काराच्या वेळी करावयाचे नामजप येथे देत आहोत.
सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप
(संदर्भ : ‘हिंदु जनजागृती समिती’चे संकेतस्थळ)
बाळकृष्ण चापेकर यांनी फाशी जाण्याआधी सूर्यनमस्कार घातले होते. त्याविषयी एका ख्रिस्त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही हे काय करताय ?’ त्यावर चापेकर म्हणाले, ‘आमच्या धर्मात सांगितले आहे, जे काही ईश्वरचरणी समर्पित करायचे, ते टवटवीत असले पाहिजे. म्हणून हा देह समर्पित करतांनाही तो टवटवीतच असला पाहिजे.’