आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही ! – पाक
यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !
इस्लामाबाद – अमेरिकेच्या ‘सीआयए’कडून ‘क्रॉस बॉर्डर काउंटर टेररिज्म मिशन’ अंतर्गत अफगाणिस्तानमधील अल् कायदा, इसिस किंवा तालिबान यांच्यासारख्या जिहादी आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी घेतली. ते येथे एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
सौजन्य : Axios
इमरान खान पुढे म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या भूमीचा वापर विदेशी सैन्याला करू देणार नाही. केवळ भूमीच नव्हे, तर त्यांना आम्ही आमच्या हवाईतळाचाही वापर करू देणार नाही. अफगाणिस्तानमधील कुठलीही समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तान सिद्ध आहे.’’ अफगाणिस्तानमध्ये १८ वर्षे लढाई लढल्यानंतर अमेरिकेचे सैन्य आता टप्प्याटप्प्याने परत जात आहे.