सतना (मध्यप्रदेश) येथे दुचाकी वाहन दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या रोहितची सलाम आणि सद्दाम यांच्याकडून निर्घृण हत्या !
-
क्लच वायरने गळा आवळला !
-
शव गाडून त्यावर ‘हँडपंप’ उभारला !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा ! यावरून हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक किती मुजोर झाले आहेत, हेच स्पष्ट होते ! एरव्ही अल्पसंख्यांकांसाठी गळा काढणारे पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आता त्यांच्या क्रौर्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
सतना (मध्यप्रदेश) – दुचाकी वाहन दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या येथील रोहित कुशवाहा (वय १९ वर्षे) याची सलाम खान आणि सद्दाम खान यांनी क्लच वायरने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
रोहित हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तो हरवल्याची तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनीही त्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. शेवटी पोलिसांनी त्यांचे ‘सायबर सेल’ आणि ‘सीसीटीव्ही फूटेज’ यांचे साहाय्य घेतले. यात पोलिसांना काही पुरावे हाती लागले. त्या आधारावर पोलिसांनी सलाम आणि सद्दाम यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा स्वीकारला.
लाश को जमीन में गाड़कर ऊपर से लगा दिया हैंडपंप#MadhyaPradesh #crime https://t.co/9T4cv5fzHd
— AajTak (@aajtak) June 18, 2021
सलाम आणि सद्दाम या दोघांनाही रोहितकडून कर्ज हवे होते. त्यास रोहितने नकार दिला. त्यामुळे राग येऊन या दोघांनी रोहितची हत्या केली. यानंतर तीन फूट खोल आणि दीड फूट रुंद खड्डा खणून त्यात रोहितचे शव एका प्लास्टिकमध्ये गुंडाळून ते गाडले अन् त्यावर ‘हँडपंप’ उभारला.