हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यसाठी योगदान द्या !
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी होणे
- हिंदु राष्ट्राविषयी जनजागृती आणि विचार प्रसारित करणे
- शिक्षकांनी शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मृतीदिन साजरे करणे
- अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्यांना कायदेशीर साहाय्य निःशुल्क करणे
- पत्रकारांनी वृत्तपत्रांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व सांगणारे लेखन करणे
- शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रचलित प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी हिंदु राष्ट्रात राहू नयेत, यासाठी उपाय शोधणे
- व्यापार्यांनी प्रतिमास वस्तू किंवा द्रव्य अर्पण देणे
- वाचनालयांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार प्रसारित करणारे ग्रंथ उपलब्ध करून देणे
- संत आणि आध्यात्मिक संप्रदाय यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना नामजप करणे
- वेदपाठशाळा आणि पुरोहित यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्यांना आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी यज्ञयाग करणे
- हिंदु संघटनांनी प्रबोधनपर उपक्रम राबवणे
(संदर्भ : ‘हिंदु जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’)