खोट्या निधर्मीपणाला बळी न पडता घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी करा !
- भारत प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्र आहे ! अन्य पंथांच्या संस्थापकांच्या जन्मापूर्वी सहस्रोे वर्षांपासूनच भारतात हिंदूंच्या अस्तित्वाचे उल्लेख म्हणजे रामायण-महाभारत आहेत. आज जी निधर्मी राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे, ती गेल्या काही दशकांतीलच आहे. मग हा सहस्रो-लाखो वर्षांचा इतिहास विसरायचा का ?
- ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटना निर्माण झाली त्या वेळी नव्हता, तर इंदिरा गांधी यांनी तो वर्ष १९७६ मध्ये घुसवला. त्यामुळे तो जसा घुसवला तसा तो काढताही येऊ शकतो !
- राज्यघटनेत घुसडलेल्या ‘निधर्मी’ शब्दामुळे सर्वच राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करतात. त्यामुळे हिंदूंनाच दुय्यम दर्जाचे स्थान प्राप्त झाले आहे. इतके की, हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणण्यास लाज वाटते, ‘श्रीराम’ म्हणायला लाज वाटते, मंदिरात जायला लाज वाटते.
- हिंदूंचा धर्म विश्वकल्याणकारी असूनही आणि देश हिंदूबहुल असूनही आज हिंदु धर्म देशाचा प्रमुख धर्म नाही. जगाच्या नकाशावर प्रत्येक राष्ट्राला त्याचा धर्म आहे.
‘सेक्युलॅरिझम’ ही युरोपीयन इतिहासातील ख्रिस्त्यांची संकुचित संकल्पना आहे. राज्य करतांना कोणत्याही पंथाचा चर्चचा आधार घ्यायचा नाही, अशी ही संकल्पना होती. ‘सेक्युलर’ या शब्दाचा मूळ अर्थ तिथे ‘पंथनिरपेक्ष’ असा आहे; परंतु भारतात त्याचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा केला गेला ! पंथ हा संकुचित असतो, तर ‘धर्म’ ही संकल्पना वैश्विक आहे. त्यामुळे संकुचित ‘सेक्युलर’पणा हा काही धर्म किंवा राष्ट्र विचार असू शकत नाही. – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.