हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !
‘धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य हे धर्माचरण आणि साधना करणारी व्यक्तीच करू शकते.
‘दैवी सामर्थ्याच्या बळावरच धर्मसंस्थापना होते’, असे इतिहास सांगतो. पांडवांना भगवान श्रीकृष्णाने, तर छत्रपती शिवरायांना देवी भवानीने आध्यात्मिक सामर्थ्य प्रदान केले होते. धर्माचरणानेच आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. हिंदूंनो, तुम्हीही हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले