महापुरुषांचा राष्ट्रविचार !
स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकरगुरुजी आदी थोर पुरुषांनीही हिंदु राष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. जेथे ‘रामराज्य’ प्रत्यक्षात अवतरले, ते राज्य आज एक दंतकथा ठरवली जात आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला जात आहे.