महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सुपरलेटिव्ह प्रेझेंटेशन अवॉर्ड’ (अत्युत्तम प्रस्तुतीकरण पारितोषिक) !
श्रीलंकेत आयोजित करण्यात आली ७ वी ‘जागतिक महिला अभ्यास परिषद २०२१’
मुंबई – ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंका’ यांनी नुकत्याच ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ७ व्या ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वूमन्स स्टडीज् २०२१’ (जागतिक महिला अभ्यास परिषद २०२१) या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सहभाग घेतला होता. विश्वविद्यालयाच्या अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे यांनी ‘अलंकारांचा स्त्रियांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हा शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले असून पू. (सौ.) भावना शिंदे या सहलेखिका आहेत. या शोधनिबंधाच्या प्रस्तुतीकरणाला या परिषदेने ‘सुपरलेटिव्ह प्रेझेंटेशन अवॉर्ड’ (अत्युत्तम प्रस्तुतीकरण पारितोषिक) दिले आहे.
या परिषदेतील सांस्कृतिक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक व्हिडिओ दाखवण्यात आला. व्हिडिओच्या माध्यमातून संगीत आणि नृत्य यांचे प्रत्येकी एक सात्त्विक सादरीकरण अन् त्यांचा आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम यांविषयी संशोधनावर आधारित माहिती दाखवण्यात आली होती. गळ्यातील ३ प्रकारच्या हारांचे ते परिधान करणार्यांवर होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र अन् सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनाची माहिती पू. (सौ.) भावना शिंदे यांनी उपस्थितांना दिली होती.
|