हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
|
आज देश गुन्हेगारी, हत्या, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, बेरोजगारी, गरिबी, घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी आदी अनंत समस्यांनी ग्रासला आहे. हिंदूंना धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, दंगली, हत्या आदी संकटांनी चोहोबाजूंनी वेढले आहे. आतंकवाद, साम्यवाद आणि नक्षलवाद आदींच्या वैचारिक आणि कृतीशील आक्रमणांनी हिंदू पिचले आहेत. सीमेवरील शत्रूराष्ट्रांची आक्रमणे आणि त्यांचीच फूस असल्याने चालू असलेली राष्ट्रद्रोह्यांची छुपी अंतर्गत बंडाळी यांनी हिंदू पिडले आहेत. अन्य धर्मीय आणि हिंदू यांच्यात कायदे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक सवलती, आरक्षण आदी अनेक संदर्भात मोठा भेदभाव केला जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचा, हिंदूंच्या घामाने भरलेल्या कराचा पैसा त्या अन्य धर्मियांसाठी वापरला जात आहे; जे हिंदूंच्या जिवावर उठले आहेत. ही सर्व स्थिती पालटण्यासाठी राष्ट्राची व्यवस्था पालटायला हवी.
अमेरिका, इंग्लंडसह जगातील प्रत्येक राष्ट्राचा विशिष्ट धर्म आहे. एकटा भारत तथाकथित ‘निधर्मी’ देश आहे. भारताच्या निधर्मी राष्ट्राची व्याख्या ‘मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंवर अन्याय’ अशी झाली आहे. जगात ५२ इस्लामी राष्ट्रे आणि १२७ ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. लक्षावधी वर्षांपासून सनातन हिंदु धमिर्यांचे हे राष्ट्र असतांना आणि येथे हिंदु बहुसंख्यांक असतांना हे हिंदु राष्ट्र का नको ?
इस्लामी आतंकवादी संघटनांना ‘खुरासान’ निर्माण करायचे आहे, तर पोप पॉल यांना भारत ख्रिस्तमय करायचा आहे. हे दोन्ही होण्यापासून या राष्ट्राला वाचवायचे असेल, तर येथे हिंदु राष्ट्र निर्माण करणे अपरिहार्य आहे !
संपूर्ण विश्वात प्राचीन काळी केवळ हिंदु धर्म अस्तित्वात होता. जगातील सर्वच देशांमध्ये सनातन हिंदु संस्कृतीचे पुरावे मिळतात. हिंदु धर्म पृथ्वीला आपले मानणारा आहे आणि जगाला सुसंस्कृत करण्याची त्याची क्षमता आहे.
विश्वाची त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राची सध्याची जी अस्थिरता, अधोगती आहे, त्याचे आध्यात्मिक कारण रज-तमाचे प्राबल्य हे आहे. धर्माचरणी आणि सत्त्वगुणप्रधान लोकप्रतिनिधी अन् त्यांचे सेवक धर्माधिष्ठित म्हणजेच आदर्श, सर्व गुणांनी युक्त अशी आदर्श व्यवस्था निर्माण करू शकतात. हेच धर्माचरणी लोकप्रतिनिधींचे धर्माचरणी प्रजेचे धर्मनिष्ठ हिंदु राष्ट्र असेल !