भाजपमध्ये गेलेल्या ३५० कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश !
पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे नेते आणि कार्यकर्ते कधी राष्ट्राशी एकनिष्ठ रहातील का ? असे स्वाभिमानशून्य आणि तत्त्वहीन कार्यकर्ते असलेला पक्ष जनहित काय साधणार ?
बीरभूम (बंगाल) – काही मासांपूर्वीच पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या ३५० कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. बंगालमधील निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता; परंतु या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर आता हेच नेते अन् कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.
बीजेपी की हार से हताश हैं कार्यकर्ता, TMC में शामिल होने के लिए लगा रहे गुहार | #WestBengal #Politics | @AnupamMishra777 https://t.co/1BNLWZsvHO
— AajTak (@aajtak) June 18, 2021
तृणमूल काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश द्यावा, या मागणीसाठी या सर्व कार्यकर्त्यांनी येथील पक्ष कार्यालयासमोर ४ घंटे आंदोलन केले. भाजपमध्ये जाऊन चूक केल्याचे ते वारंवार म्हणत होते. त्यानंतर तृणमूलच्या पंचायत प्रधानाने सर्व कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना ‘शुद्ध’ केले आणि पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व दिले. काही दिवसांपूर्वी तृणमूलच्या याच पक्ष कार्यालयात अशा प्रकारे भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या अन्य काही कार्यकर्त्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी भाजपमध्ये गेलेले तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनीही पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.