गोव्यात काँग्रेसच्या बैठक कक्षाबाहेर धक्काबुक्की, तर मडगाव येथे अल्पसंख्यांक सदस्याची वादावादी
काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नीतीमत्ता दर्शवणार्या घटना ! असे आक्रमक प्रवृत्तीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी बनले, तर काय स्थिती होईल, याची कल्पना करू शकत नाही !
पणजी – काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव चार दिवसांच्या भेटीसाठी १७ जून या दिवशी गोव्यात आले आहेत. संघटना बळकट करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी दिनेश गुंडू राव यांच्या मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये १७ जून या दिवशी दुपारनंतर अनेक बैठका झाल्या. बैठकीच्या पूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी संकल्प आमोणकर यांनी ‘प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर हेच हवेत’, असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. याची माहिती प्रभारी दिनेश गुंडू राव यांना अगोदरच मिळाली होती. संकल्प आमोणकर आणि त्यांचे सहकारी यांनी कक्षात प्रवेश केल्यावर प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी त्यांना पक्षशिस्तीचे खडे बोल सुनावले. प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ‘पक्षाचा निर्णय सर्वांना बांधील असेल आणि स्वत:ची मते पक्षाच्या मंचावर मांडावी’, असे संकल्प आमोणकर यांना सांगितले. यानंतर संकल्प आमोणकर आणि त्यांचे सहकारी कक्षातून बाहेर आल्यावर पक्षाचे अन्य एक पदाधिकारी भिके यांनी संकल्प आमोणकर यांना एका सूत्राविषयी विचारणा केली असता आमोणकर त्यांच्या अंगावर धावून गेले. या वेळी धक्काबुक्की झाली.
काँग्रेसच्या जिल्हा समितीचे सदस्य उस्मान खान यांनी बैठकीसाठी न बोलावल्याने केली वादावादी !
काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासमवेत बैठकीत न बोलावल्याने काँग्रेसचे जिल्हा समितीचे सदस्य उस्मान खान यांनी बैठक स्थळाच्या बाहेर वादावादी केली. उस्मान खान यांनी या वेळी जिल्हा समितीचे अध्यी ज्यो डायस यांच्याकडेही काही वेळ वाद घातला. ‘वास्तविक प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासमवेतच्या बैठकीत महत्त्वाच्या पदाधिकार्यांनाच बोलावण्यात आल्याने उस्मान खान यांना बैठकीत बोलावण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता’, असे काँग्रेसच्या एका पदाधिकार्याने सांगितले. यानंतर उस्मान खान यांनी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. (मुसलमानप्रेमी काँग्रेसला घरचा अहेर ! – संपादक)