भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन
मोहाली (पंजाब) – भारताचे ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंह यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते.
Milkha Singh, greatest Indian athlete, dies at 91 https://t.co/w9zZ3S2onI
— Hindustan Times (@HindustanTimes) June 18, 2021