सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !
सातारा, १८ जून (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात १६ जूनपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाले, ओढे, नद्या तुडूंब भरून वहात आहेत. सातारा शहराला पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव २ दिवसांच्या पावसानेच तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. शहराची लोकसंख्या पहाता भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी गत ३ वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. या वर्षीही काम पूर्ण न झाल्यामुळे पाणीसाठा आणि साठवण क्षमता तेवढीच रहाणार आहे. प्रतिवर्षी जुलैमध्ये भरणारा तलाव या वर्षी जूनमध्येच भरला आहे.