सनातनचा रामनाथी आश्रम, तसेच गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या रामनाथी आश्रम परिसरात विविध औषधी वनस्पती, फळे, फुले आदींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे वानरांपासून संरक्षण करणे, झाडांची देखभाल करणे, औषधी वनस्पतींची रोपे सिद्ध करणे, नवीन फुलझाडांची लागवड करणे, या सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे. तसेच अशा प्रकारे झाडांच्या लागवडीची सेवा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत विविध ठिकाणी चालू करण्यात येणार आहे.

शेतीकामाची आवड असणारे, शारीरिक सेवा करू शकणारे, शेती करण्याचा अनुभव असलेले आणि अनुभव नसला तरी अशा प्रकारची सेवा शिकण्यास इच्छुक असलेल्या साधकांना या सेवेत सहभागी होता येईल. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून ही सेवा शिकून स्वत:च्या शेतात किंवा परसबागेत अशा प्रकारची सेवा नियमितपणे करू इच्छिणारे साधकही ही सेवा शिकण्यासाठी नाव नोंदवू शकतात. इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून बाजूच्या सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.

संगणकीय पत्ता : mav.lagvad@gmail.com

टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’

– (श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२१)