हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलकाला वैयक्तिक वादातून जिवंत जाळले !
बहादूरगड (हरियाणा) – येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला जिवंत जाळण्याच्या प्रकरणी पोलिसांनी कृष्ण नावाच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. कृष्ण त्याच्या सहकार्यांसमवेत अनेक दिवसांपासून या आंदोलनात सहभागी होता. त्याच्या ३ सहकार्यांसमवेत त्याने मुकेश नावाच्या व्यक्तीला जिवंत जाळले. मुकेश १६ जूनच्या सायंकाळी आंदोलनाच्या ठिकाणी त्याच्या ४ मित्रांसह दारू प्यायला. त्या वेळी त्यांच्यात वाद झाल्याने मुकेश याच्यावर इंधन टाकून त्याला जाळण्यात आले.
Man reportedly burnt alive during farmers protest at Bahadurgarh, Haryana.
Details by Gurpreet. pic.twitter.com/X1xeStfAuO
— TIMES NOW (@TimesNow) June 17, 2021
या घटनेच्या दुसर्या दिवशी मुकेशच्या नातेवाइकांनी आरोपींना अटक करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद करत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी हानीभरपाई आणि सरकारी नोकरी यांची मागणीही केली.