लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्यांमध्ये आढळली कोरोनाची सौम्य लक्षणे ! – ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालातील माहिती
नवी देहली – लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली, अशी माहिती ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालात देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत या आरोग्य कर्मचार्यांनी घरी राहून उपचार घेतले आणि त्यातून ते बरे झाले होते.
९२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पूर्ण लसीकरणानंतरही आढळली करोनाची सौम्य लक्षणे; अभ्यासातून माहिती समोर https://t.co/gBLX56bd07 via @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) June 18, 2021
या अहवालानुसार कोरोनाच्या संसर्गावर लसींचा प्रभाव जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात अनुमाने १६ सहस्र आरोग्य कर्मचार्यांचे मूल्यांकन केले गेले. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या कर्मचार्यांना दुसर्या मात्रेच्या १४ दिवसांनंतर स्वतःमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांपैकी १ टक्के आरोग्य कर्मचार्यांना त्यांनी दोन्ही लस घेतल्यानंतरही अतीदक्षता विभागात, तसेच ‘व्हेंटिलेटर’वर ठेवावे लागले.