बेंगळुरू येथील दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन

पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट करण्यास उशीर केल्याने जामीन  !

आरोपपत्र प्रविष्ट करण्यास उशीर करणार्‍या संबंधितांवर राज्यातील भाजप शासनाने कारवाई केली पाहिजे !

बेंगळुरू – गेल्यावर्षी ऑगस्ट मासामध्ये शहरातील डी.जे. हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी परिसरात धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक केलेल्या दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. आरोपपत्र प्रविष्ट करण्यास विलंब केल्यामुळे न्यायालयाने दंगलखोरांना जामीन संमत केला. तसेच त्यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट करण्यास अधिक वेळ देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे. १११ आरोपींपैकी ९० आरोपींना यापूर्वी विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. उर्वरित २१ जणांना उच्च न्यायालयाने आता जामीन दिला आहे.

महंमद पैगंबर यांचे सामाजिक माध्यमांतून कथित अवमान केल्याच्या अफवेवरून १० ऑगस्ट २०२० च्या रात्री येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यात आले होते. तसेच आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावरही आक्रमण केले गेले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता, तर तिघे घायाळ झाले होते.