निर्बंध शिथिल झाल्यानंतर नगर येथील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ
नगर – मेमध्ये दळणवळणबंदी लागू केल्यानंतर नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होती; परंतु जूनमध्ये पहिल्या स्तरातील निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येत १६ जूनला ४३७, तर १७ जूनला ६७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५ सहस्र ३३८ वर पोचली आहे.
१७ जून या दिवशी नगर शहरातील रुग्णसंख्या ११ वरून १४९ पर्यंत पोचली आहे. ‘प्रत्येक गुरुवारी साप्ताहिक आढावा घेऊन पुढील निर्बंधांसंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत’, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.