गुरुमाऊलीच्या अनुसंधानी रमावे ।
१४.६.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रत्येक कृती करतांना ‘गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असे अनुभवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे नंतरच्या आठवड्यात अधून मधून प्रयत्न केल्यावर मला गुरुदेवांचे चैतन्य अनुभवता आले. २०.६.२०२० या दिवशी भाववृद्धीसाठी प्रयत्न करतांना मला खालील भावपंक्ती सुचल्या.
गुरुदेवांना आठवावे ।
भावाश्रू गाली ओघळावे ॥ १ ॥
नामस्मरण गुरूंचे करावे ।
अनुसंधानी तयांच्या रमावे ॥ २ ॥
सत्संगी भावविभोर व्हावे ।
चैतन्यात चिंब भिजूनी जावे ॥ ३ ॥
सत्सेवी पूर्ण झोकून द्यावे ।
प्रसारकार्य वाढत जावे ॥ ४ ॥
गुरूंना तन-मन-धन अर्पावे ।
अंतरी आनंदतरंग अनुभवावे ॥ ५ ॥
बालक होऊनी गुरूंच्या कुशीत शिरावे ।
गुरुमाऊलीने चैतन्य देत निजवावे ॥ ६ ॥
– श्री. संदीप नरेंद्र वैती, मुंबई (२०.६.२०२०)