विरोबा मंदिरातील (जिल्हा सांगली) ४ मासांपूर्वी चोरून नेलेल्या देवतांच्या मूर्ती चोराने परत आणून दिल्या !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
मिरज (जिल्हा सांगली) – ४ मासांपूर्वी बेडग येथील बिरोबा मंदिरातील पितळी घोडे, बकर्यांच्या मूर्ती, गाभार्यातील ९ किलो वजनाचा पितळी नंदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याचे मूल्य १० सहस्र रुपयांहून अधिक होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २ दिवसांपूर्वी या सर्व मूर्ती मंदिराबाहेर परत आणून ठेवल्याचे पुजार्यांना आढळले. मूर्ती सुस्थितीत होत्या. पुजार्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी पंचनामा करून मूर्ती कह्यात घेतल्या. न्यायालयाच्या अनुमतीने त्या परत दिल्या जातील, असे सांगितले.