मुंबईतील हाऊसिंग सोसायटीमध्ये कोरोनावरील बोगस (खोट्या) लस देऊन लाखो रुपयांची लूट !
मुंबई – कांदिवली येथील हिरानंदानी इस्टेट सोसायटीमधील ३९० रहिवाशांना ३० मे या दिवशी ‘कोविशिल्ड’ ही कोरोनावरील लस देण्यात आली. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या वतीने लस देण्यासाठी एका दिवसाचे शिबिर आयोजित केले होते. यामध्ये लसीकरणासाठी प्रतिव्यक्ती १ सहस्र २६० रुपये घेण्यात आले; मात्र हे लसीकरण बोगस (खोट्या) असल्याचा प्रकार पुढे आला आहे. या लसीकरणासाठी ४ लाख ९१ सहस्र ४०० रुपये देण्यात आल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
मुंबईत लसीकरण घोटाळा? सोसायटीतल्या रहिवाशांचा आरोप#CoronaVirus #CoronaVaccination #Scam #Mumbai https://t.co/PxIHmDlrSL
— LoksattaLive (@LoksattaLive) June 16, 2021
यानंतर लस घेणार्यांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्रे देण्यात आली; मात्र या रुग्णालयांनी लसीकरणासाठी अशा प्रकारे कोणतेही शिबिर घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या लसीकरणाची छायाचित्रेही काढू देण्यात आली नव्हती. सोसायटीतील नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून यामध्ये सरकारनेही हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.