सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा २० जुलैला, तर १२ वीचा ३१ जुलैला निकाल !
नवी देहली – इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल २० जुलैला, तर १२ वीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलै या दिवशी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा सी.बी.एस्.ई. बोर्डाने केली आहे.
१. बोर्डाने १७ जून या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०:३०:३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये ३ प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
२. इयत्ता १० वीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के गुण देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या ३ विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण ११ वीच्या अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित असतील आणि उरलेले ४० टक्के गुण हे १२ वी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलीयम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येणार आहेत.
Results of Class 12th board examinations will be prepared by adding 30% marks of best three subjects of Class 10th, 30% marks of Class 11th, and 40% marks of unit test, mid-term or pre-board exams of Class 12th: Sanyam Bhardwaj, Examination Controller, CBSE pic.twitter.com/rJjYNZ1oXT
— ANI (@ANI) June 17, 2021