भारतातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ३० लाख कर्मचार्यांच्या नोकर्या जाण्याची शक्यता ! – बँक ऑफ अमेरिका
नवी देहली – माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या उद्योगांमधील वाढत्या ‘ऑटोमेशन’ तंत्रज्ञानामुळे वर्ष २०२२ पर्यंत भारतातील ३० लाख कर्मचार्यांच्या नोकर्या जाणार असल्याची शक्यता ‘बँक ऑफ अमेरिका’कडून वर्तवण्यात आली आहे.
भारतातल्या IT क्षेत्रातल्या ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार? – बँक ऑफ अमेरिकाhttps://t.co/3pdFPRynHP < येथे वाचा सविस्तर वृत्त#informationtechnology #Jobs #BankofAmerica @BankofAmerica pic.twitter.com/MuGDiVaLsM
— LoksattaLive (@LoksattaLive) June 17, 2021
यामुळे या आस्थापनांची वेतनापोटी देण्यात येणारी १०० अब्ज डॉलर्सची (७ लाख ३३ सहस्र कोटी रुपयांची) बचत होईल, असे एका अहवालातून समोर आले आहे. ‘नॅसकॉम’च्या मते देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास १ कोटी ६० लाख लोक काम करतात. त्यातील ९० लाख लोक कमी-कौशल्य सेवांमधील क्षेत्रांत आणि ‘बीपीओ’ सेवांमध्ये कार्यरत आहेत.